Educational Assistance

श्री मुरलीधर संगीतालयाचा नवीन उपक्रम शिक्षणाला मिळणार संगीतमय साथ
सिद्धार्थ विद्या मंदिर व श्री मुरलीधर संगीत विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने संगीत वर्गाचे उद्घाटन

कलेची देवता गणराज, नृत्यदेवता नटराज, विद्यादेवता सरस्वती,क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित अतिथींचे स्वागत पवित्र अशा तुळशीचे रोप देऊन करण्यात आले. त्यानंतर मुरलीधर संगितालयाची माहिती श्री वैभव चव्हाण यांनी करून दिली. त्यानंतर श्री सुहास चव्हाण यांनी आपल्या जीवनातील संगीताचे महत्त्व विषद केले. संगीतामुळे आपल्या मनावरील ताणतणाव कमी होऊन आपण आनंदी राहतो. त्याचबरोबर कला क्षेत्रातील संधीविषयी माहिती दिली. त्याबरोबर श्री शाम चव्हाण यांनी संगीत विद्यालय सुरू करत असल्याची घोषणा केली. गुरू-शिष्य परंपरेची माहिती दिली. तानपुरा वाद्याची माहिती दिली.शेवटी विद्यार्थी सहायता प्रतिष्ठानच्या सचिव सौ शुभा गुप्ते मॅडम यांनी कला क्रीडा वर्ग सुरू करण्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली त्या बरोबर सर्व शिक्षकवृंदाच्या सहकार्याने विविध वर्ग चालू आहेत हे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कलेची जोपासना करण्याचे आवाहन केले.श्री सुहास चव्हाण यांनी संगीताचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यात राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीत यांचे सुर कसे असतात याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या भाषाशैलीत श्री अशोक काठे यांनी केले. अतिथींचा परिचय श्री दिलीप गायकर यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार सौ सुनिता वंजारी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, पालक व शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते.
छायाचित्र - जे जे आर्ट्स (जयवंत जाधव)

...
Donate Now